शंकर चाफाडकर : पुस्तकांच्या घरातला माणूस
चाफाडकरांची तब्येत अलीकडे बरी नसते, त्यांना दम्याचा त्रास होतो आहे, हे माहीत होतं. त्यांचं वयही ऐंशीच्या पुढे झालं होतं. पण तरीही त्यांच्या उत्साहात, वाचनात आणि ग्रंथप्रेमात तसूभरही फरक पडला नव्हता. पुस्तकांविषयी बोलताना त्यांना आपल्या तब्येतीचा नेहमीच विसर पडायचा. बेळगावातल्या या पुस्तकप्रेमीचा हा खजिना अनुभवण्यासाठी कोल्हापूर, हुबळी, धारवाड, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून वाचनप्रेमी जात असत.......