बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे!
बाबा (अवचट) हा या दृष्टीनं पाहावयास गेल्यास ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण हा त्याचा अनप्रेडिक्टेबलपणा, छांदिष्टपणा जगाशी फटकून राहणारा नाही, तर जगाला बरोबर घेऊन जाणारा आहे. आम्ही त्याच्या साहित्यिक, सामाजिक आणि कलात्मक या तिन्ही पैलूंचा परिचय या माहितीपटात करून दिला आहे. विशेष गोष्ट म्हणजे ते तिन्ही पैलू एकमेकात इतके अलगदपणे मिसळले आहेत की, त्यांना वेगळं करणं अवघड आहे.......