दु:खांना हसावयाचे, ती हसण्यावारी न्यावयाची, हसून हसून ती विसरून जावयाचे, हा विनोदाचा खरा हेतू आहे
विनोदामध्ये कलाटणी देण्याचं काम ‘पंच लाइन’ करते. श्रोत्यांना या कलाटणीचा थोडासा जरी सुगावा लागला, तरी एखाद्या फुग्यातली हवा निघून जावी तशी विनोदातली गंमत निघून जाते. म्हणूनच हास्यनिर्मितीमध्ये अचानकपणे आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या कलाटणीला महत्त्व असतं. अपेक्षा आणि त्यांना मिळालेली कलाटणी यांच्यातील दरी जेवढी मोठी, तेवढा हास्याचा स्फोट अधिक मोठा.......