काय साठीचं दशक होतं राव!
मी उल्लेख केलेलं संगीत आणि संगीतकार आणि असे अनेक या सर्वांनी मिळून ही साठच्या दशकातली अभिमानास्पद मूस बनवली आहे. शैलींची आणि रागांची, नादांची आणि आवाजांची, तरुण, कल्पक, प्रगल्भ आणि फल दायी अशी सुवर्णनिर्मिती केली आहे. साठच्या दशकातल्या या संगीत रसायनशास्त्रज्ञांना खरंच सोनं सापडलं होतं असं वाटतं. निदान त्याची चमक निघून जाईपर्यंत तरी.......