खऱ्याखोट्याची शहानिशा करण्याची विचारशक्ती गमावून बसलेला समाज हा कोणत्याही देशासाठी आशादायक असू शकत नाही!
‘फेक न्यूज’ नावाचे आजचे हे घातक शस्त्र उद्याचा नाश करणार आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी काही मूठभर विचारी लोक, संस्था करत असलेले प्रयत्न वगळता बहुतांश नागरिक हातावर हात धरून मूक प्रेक्षक झाले आहेत. कोणत्याही विचारी नागरिकाला हतबल करणारे हे चित्र आहे. स्वतंत्र भारतामध्ये ‘भूखमरी से आझादी’ मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानी हस्तक ठरवण्यात आले. आता नागरिकांनीच ‘फेक न्यूज से आझादी’च्या घोषणा देण्याची गरज आहे.......