ही लहानशी पुस्तिका एकाच वेळी खगोलशास्त्रीय मीमांसेचा आधार घेत कालगणनेची गोष्ट सांगते आणि त्याच वेळेला भारतीय जीवनशैलीतल्या धर्म‘मुक्त’ चिंतनाचा निर्देश करत आपल्या राजकीय पूर्वग्रहांवरही बोट ठेवते!
काळाच्या संदर्भात आपण ‘आधुनिक’ हा शब्द वापरतो. ‘आधुनिक’ जीवनशैलीच्या आधारे हा शब्द वापरला जातो. त्यामुळे या जीवनशैलीची लक्षणे कोणती, याचे नेमक्या शब्दात डॉ. देव विवेचन करतात. माणूस हा ‘देव’ आणि ‘दैव’ यांच्या हातातले बाहुले नाही, म्हणून भौतिक जगात घडणाऱ्या घटनांची ‘बायबल’निष्ठ मीमांसा ज्या क्षणी माणूस त्याज्य समजू लागतो, तोच त्यांच्या जीवनातला ‘आधुनिकते’चा आरंभ असतो.......