‘गॉडफादर’ला चित्रपट म्हणून मिळालेलं यश, त्यातील नटांचं अभिनय कौशल्य आजही अफलातून वाटतं!
अंमली पदार्थांचा व्यापार आणि त्यातून निर्माण होणारी लालसा, याचं अत्यंत भेदक चित्रण हे ‘गॉडफादर’चं महत्त्वाचं अंग आहेच, पण त्याचबरोबर त्यातून मनुष्य-स्वभावाचे कंगोरेदेखील दिसतात. मात्र ते केवळ गुन्हेगारी विश्वातल्या, हेही तितकंच खरं. केवळ कायद्याच्या परिघाबाहेर नव्हे, तर स्वत:चे कायदे निर्माण करणारा डॉन- विटो कार्लोन ही एक अफलातून व्यक्ती आहे. तो एक तल्लख बुद्धीचा, खऱ्या अर्थानं ‘गॉडफादर’ होऊन जातो.......