चेकपॉईंटवर दोन रांगा आहेत. युक्रेनियन लोक डावीकडे आहेत आणि उर्वरित उजवीकडे. त्या बसमध्ये एकही युक्रेनियन नव्हता
इराक, लिबिया, अफगाणिस्तान आणि सीरियावरील आक्रमणामुळे पळून जाणाऱ्या निर्वासितांसाठी आपल्या देशाचे दरवाजे बंद करणारे युरोपियन देश, युक्रेनियन लोकांसाठी ते खुले करतात, याचा अर्थ काय? अर्थात युक्रेनमधून येणाऱ्या निर्वासितांमध्येसुद्धा ते भेदभाव करत आहेत, असे दिसून आले आहे. ते जन्माने युक्रेनियन असलेल्या निर्वासितांवरच अधिक लक्ष देत आहेत. अशा त्यांना ते ‘गोरे’, ‘बुद्धिमान’, ‘शिक्षित’, ‘सुसंस्कृत’ असे संबोधतात.......