निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर नाही, भावनिक मुद्द्यांवर जिंकल्या जातात!
प्रचंड उर्जा असलेला तरुणवर्ग देशात ५५ टक्क्यांपर्यंत आहे. यातले २५ टक्के तरुण २००० नंतर जन्मलेले आहेत. स्वातंत्र्य आंदोलन, पंडित नेहरूंचा समाजवाद, इंदिरा गांधींचा कणखरपणा, राजीव गांधीची दूरदृष्टी, मंडल आयोग, दिल्लीतली शीख दंगल, रामजन्मभूमी आंदोलन, बाबरी उदध्वस्तीकरण, मुंबई दंगल, गुजरातचा नरसंहार याबद्दल ही पिढी अनभिज्ञ आहे. संघाचं आक्रमक राजकारण, प्रखर मुस्लीमविरोध बघत-बघत ही पिढी मोठी झाली आहे.......