बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत
बाहेरचं जग कसं असेल? तिथं आयुष्याला अर्थ असेल का नसेल? ते आपल्याबद्दल असेल का नसेल? आपल्याला माहीत नसलेलं तिथे किती असेल? कोणास ठाऊक, कदाचित तिथं आपल्याला न सुचणारे प्रश्नही असतील तर? आणि उत्तरं मिळण्यासारखी असतात. बाटलीतून बाहेर पडून फक्त त्याआधी ती आडवी पाडावी लागणार. सगळं सुरळीत चालू असताना गदागदा हलवून बॅलन्स घालवावा लागणार.......