फुले दाम्पत्याच्या कार्यामुळे केवळ मुक्ता साळवेला ‘मुक्तीचा मार्ग’ मिळाला नाही, तो इतर सर्व स्त्रियांना मिळाला, तसाच तो तमाम पुरुषांनाही मिळावा!
गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे सारं वास्तव माहिती असतं. स्वयंघोषित गुरू, बाबा, महाराज, योगी, साधू आणि त्यांच्या संस्था, देवस्थानं, आखाडे आणि त्यांचे सत्संग, स्वाध्याय यात जनता अडकलेली आहे. हे सारे उपक्रम स्त्रियांच्या दुय्यमत्वाला, अंधश्रद्धांना, रूढी-परंपरांना आणि विशिष्ट प्रकारच्या राजकीय विचाराला खतपाणी घालणारे असतात. या विचारांची समीक्षा करून मग ते स्वीकारावे, अशी मानसिकता निर्माण होत नाही.......