स्पर्धा परीक्षा : समाज वास्तवाची दुसरी (काळी ठिक्कर) बाजू
शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी, बसेस-बस स्थानकांवर स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती असतात. त्या इतक्या प्रभावी असतात की, खेड्यातल्या सामान्य कुटुंबातून आलेला एखादा तरुण ‘स्पर्धा परीक्षा पास होणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय’ असं मनोमन ठरवतो आणि स्वप्नांच्या दुनियेत वावरायला सुरुवात करतो. त्या दुनियेत ध्येयाच्या अनिश्चिततेचा काळाकुट्ट अंधार आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही.......