वैविध्यपूर्ण संस्कृतींनी नटलेल्या आपल्या देशात फक्त एका गटाला लागू होईल, अशी भाषा शासकीय-प्रशासकीय पातळीवर वापरणं, हे अत्यंत संकुचितपणाचं लक्षण आहे!

मंदिर हे हिंदू धर्मियांचं प्रार्थनास्थळ. तिथं देवाची पूजाअर्चा केली जाते. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची पूजा करतो, तेव्हा तिची मनापासून काळजी घेतो. तशीच काळजी या केंद्रांमध्ये आरोग्याची घेतली जावी, असा केंद्र सरकारचा मानस असावा. एखाद्या विशिष्ट गटाचा त्यांच्या समुदायापुरता म्हणून हा विचार स्तुत्य आहे, परंतु ‘धर्मनिरपेक्षता’ हे तत्त्व मानणाऱ्या या देशात फक्त ‘मंदिर’ हे प्रार्थनास्थळ मानणारे लोक राहत नाहीत.......

‘अ‍ॅनिमल’ : सद्य परिस्थितीशी संबंधित सामाजिक-सांस्कृतिक पडघम एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ‘हुकुमी एक्क्या’सारखे कशा प्रकारे वापरले जात आहेत, याचे हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे

मनोरंजन म्हणून ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट जरूर पाहायला हवा, परंतु त्याच्या आडून सांगितल्या जाणाऱ्या ‘विचारा’त नेमकी काय गडबड आहे, तो जाणीवपूर्वक बनवलेल्या एखाद्या योजनेचा वा प्रोपगंडाचा भाग तर नाही ना, याचीही खातरजमा करून घेतली पाहिजे. उत्तम दिसणारं पेय चवीलाही उत्तम असतंच असं नाही, त्यात ‘भेसळ’ही असू शकते. कधी कधी तर ते आपल्या निरोगी ‘शारीरिक स्वास्थ्या’च्या दृष्टीनं ‘अपायकारक’ही असू शकतं.......

चेन्नईमधील पाणी टंचाईला जेवढा पर्यावरण बदल जबाबदार आहे, त्याहून कित्येक पटींनी जास्त जबाबदार आहे माणसाचा स्वार्थी हस्तक्षेप

पाण्याचा संयमित आणि काटकसरीनं वापर न करणं, हे वर्तन इतर भारतीयांप्रमाणेच चेन्नईमध्येसुद्धा रुजलेलं आहे. तेथील बंगालच्या उपसागराकडे वाहत जाणाऱ्या तिन्ही नद्या कित्येक वर्षं प्रदूषित पाण्यामुळे जणू डबक्यासमान आहेत. पर्यावरण बदल, अनियंत्रित शहरीकरण आणि कमी होत चाललेला लोकसहभाग हे आज भारतातील प्रत्येकच शहराचं वास्तव आहे. प्रत्येक शहरच या ना त्या प्रकारे मानवनिर्मित पर्यावरण बदलाच्या परिणामांस बळी पडत आहे.......