जगन्मित्र सुनील कर्णिक यांच्या पायांवर चक्र असावं. ते आता भ्रमंतीला निघाले असतील.
मराठी साहित्यव्यवहार हा सुनील कर्णिक यांचा सततचा ध्यासाचा विषय आहे. त्यांना एक वेळ कांद्याचे भाव माहिती नसणार. (कारण ते काम चोखपणे वहिनी करतात.) पण साहित्यातील बारीकसारीक घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्या संबंधीची त्यांची जाणकारी कौतुकास्पद आहे. ते आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनासंबंधी वा प्रश्नासंबंधी चुकूनही बोलणार नाहीत, ना ते तुमच्या या संबंधीच्या प्रश्नाविषयी कुतूहल दाखवणार. त्यांचे देणंघेणं कोणाशी असेल तर त.......