या पुस्तकाला आज जे महत्त्व मिळेल, त्यापेक्षा कैकपटीनं अधिक काही वर्षांनी येईल!
हर्डीकरांच्या लिखाणात सतत असणारा ‘मी’ आत्मसमर्थनात्मक नसून घटनेचा साक्षीदार या नात्यानं आलेला असतो. हर्डीकरांच्या याच प्रकारच्या लेखनामुळे त्यांचं हे पुस्तक केवळ तात्कालिक राजकीय विवेचन न राहता, ते एक प्रकारचं ‘क्रॉनिकल’ बनून राहील. आणि या पुस्तकाला आज जे काही महत्त्व आहे अथवा येईल, त्यापेक्षा कैकपटीनं अधिक महत्त्व काही वर्षांनी या साऱ्या काळाचं डॉक्युमेंटेशन करताना येईल, हे नक्की!.......