‘मरजावां’ : मारधाडदृश्यं आणि तार्किकतेच्या अभावानं नटलेला चित्रपट
दसऱ्याच्या दिवशी नायक-खलनायकात घडणारा संघर्ष म्हणजे झवेरीचं आपल्या चित्रपटात राम-रावणाचं, नायक-खलनायकाचं तत्त्वज्ञान अस्तित्वात आहे, असं म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आहे. इथंही “तेरे इन्त्काम में हम काम न आए तो हम दोस्त क्या काम के!”, “मैं बदला नहीं, इन्त्काम लूंगा”, “एक रावण, दस सर. एक विष्णू, दस का असर” असे कुणाही विचार करू शकणाऱ्या कान आणि मेंदूस हानिकारक संवाद आहेत.......